महाविकास आघाडीमध्येच ताळमेळ नाही ? खातेवाटपाचा तिढा सुटेना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या मंत्रिमंडळाचा ३० डिसेंबरला पूर्ण विस्तार करण्यात आला. त्या वेळी तिन्ही पक्षांच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अद्याप त्यांना खाती मिळालेली नाहीत. नवीन वर्षाची सुरुवात ही कामाने सुरु होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र ५ दिवस उलटून गेले तरीही अजून खातेवाटप झाले नसल्याने महाविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा...

 
 
 

काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून हिरवा कंदील आला असून आज म्हणजे शनिवारी खातेवाटप जाहीर होणार अशी माहिती मिळते. तेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी खातेवाटप आत्ता नाही तर २ दिवसांनंतर जाहीर करू अशी माहिती देतात. यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच ताळमेळ नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

 

बंगले वाटप आणि नाराजी नाट्यामध्येच अडकलेली महाविकास आघाडी ?

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महिनाभराने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. परंतु, यामध्ये सलग पाचव्यादिवशीही खातेवाटपाबद्दल एकमत होत नसून महाविकास आघाडीमध्ये बंगले वाटपाबाबतच चर्चा होत आहेत. कोणाला कुठला बंगला देण्यात यावा याविषयी जास्त चर्चा केल्या जात आहेत.

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा...

 
 

तसेच, आघाडीमधील मंत्र्यांचे अंतर्गत वाद हा देखील खूप मोठा विषय सत्तास्थापनेनंतर सुरु झाला आहे. त्यामुळे मंत्रिपद आणि इतर बाबींवरून मंत्र्यांमध्येच नाराजी नाट्य सुरु आहे. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे ठाकरे सरकारचे कधी लक्ष जाणार? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@