महाराष्ट्र केसरी २०२० : आबासाहेब, हनमंत पुरीने पटकावले पहिले सुवर्णपदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


पुणे : महाराष्ट्रामध्ये सर्व कुटीवीर आतुरतेने वाट पाहत असतात त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिले सुवर्ण सोलापूर व उस्मानाबादच्या मल्लांनी आपल्या नावे केले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या स्पर्धेत ५६ किलो गटात सोलापूर जिल्ह्याच्या आबासाहेब अटकळे आणि ७९ किलो गटात उस्मानाबादच्या हनमंत पुरीने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.

 

माती गटातील ५६ किलो गटात अंतिम सामन्यमध्ये आबासाहेबने कोल्हापूर शहरच्या संतोष हिरुगुडे सोबत रोमांचक लढत पाहायला मिळाली. दोघांतील सामना ८-८ गुणांनी बरोबरी साधली. त्यानंतर अखेर गुण मिळत आबासाहेबने आपल्या जिल्ह्याच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपसंचालक आनंद व्यन्केश्वर, हिंद केसरी अमोल बुचडे, ललित लांडगे उपस्थित होते.

 

विजेत्या खेळाडूंचे नावे :

 

माती विभाग ५७ वजनी गट

 

आबासाहेब अटकळे, सोलापूर जिल्हा (सुवर्ण)

 

संतोष हिरुगडे, कोल्हापूर शहर (रौप्य)

 

ओंकार लाड, कोल्हापूर जिल्हा (कांस्य)

@@AUTHORINFO_V1@@