पाकमध्ये गुरुद्वारावर हल्ला : हरभजन सिंगची इम्रान खानकडे तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : शुक्रवारी पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर स्थानिक मुस्लीम रहिवासी जमावाने दगडफेक केली. नुसती दगडफेकच नाही तर समाजाला धमकीही देण्यात आली आहे. यासर्व प्रकरणाचे तीव्र पडसाद भारतामध्येही उमटू लागले आहेत. यामध्ये आता भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेदेखील गुरुद्वारावर झालेल्या या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 
 
 

हरभजन सिंग याने म्हटले आहे की, "कळत नाही की काही लोकांना काय झाले आहे? त्यांना शांतीने का राहता येत नाही, माहीत नाही.... मोहम्मद हसन ही व्यक्ती ननकाना साहिब गुरुद्वारा उद्ध्वस्त करून त्या जागेवर मशीद बांधण्याबाबत बोलत आहे. हे अतिशय दु:खद आहे." तसेच दुसऱ्या व्हिडियोमध्ये "देव एक आहे. त्याला विभागून लोकांच्या मनात द्वेष पसरवू नका. आधी माणूस बना आणि एकमेकांचा आदर करा." असे आवाहन देखील त्याने केले आहे.

 
 
 

भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने २ व्हिडियो ट्विटरवर शेअर करत या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना या व्हिडियोमध्ये टॅग करून या गोष्टीची दाखल घ्यावी अशी तक्रारदेखील त्याने केली आहे. या व्हिडियोमध्ये मोहम्मद हसन नावाचा एक व्यक्ती पाकिस्तानी मुस्लिमांना ननकाना साहिबमध्ये राहणाऱ्या शीखांविरुद्ध भडकवत असल्याचे दिसत आहे.

@@AUTHORINFO_V1@@