पुन्हा एकदा बगदादवर अमेरिकेचे एअर स्ट्राईक ; ६ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : इराकमधील बगदाद येथे पुन्हा एकदा हवाई हल्ला झाला आहे. उत्तर बगदादध्ये भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे इराकी बिगरलष्करी सशस्त्र गटाच्या (मिलिशिया) ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा इराकमधील इराण समर्थक लढवय्यांचा गट आहे. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला चढवत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारले होते.

 
 
 

अमेरिकेने हा हल्ला बगदादच्या महत्वाच्या शहरावर केला आहे. या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक 'मिलिशिया हश्‍द अल-शाबी'चे काही लोक असल्याचे म्हटलं जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असं इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

@@AUTHORINFO_V1@@