महाविकास आघाडीला धक्का : अब्दुल सत्तार यांचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडून मंत्रिपद मिळाले औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. परंतु, कोणीही विश्वासात न घेता हे मंत्रिपद दिले गेले अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. अब्दुल सत्तरांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, राज्यमंत्री पद दिल्याने त्यांनी मंत्रिपदाचाच राजीनामा दिला आहे.

 

शिवसेनेकडून मात्र अब्दुल सत्तारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठवले आहे. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. अल्पसंख्याक समुहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखले.

@@AUTHORINFO_V1@@