कोरोना व्हायरस : जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

who_1  H x W: 0



जिनीव्हा
: चीनमध्ये वेगाने फैलत असणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत, चीनमध्ये आत्तापर्यंत दहा हजार रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २१३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे. “कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण सर्व एकत्र आलो तरच कोरोनाला रोखणे शक्य आहे”, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस म्हणाले. “कोरोना विषाणूचा फैलाव आतापर्यंत १५ देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये प्रवास करण्यावर तसेच व्यापारावर निर्बंध आणून काहीही साध्य होणार नाही”,असे टीड्रोस यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीनने वुहानसह काही शहरे पूर्णपणे बंद केली आहेत. वुहान हे कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे. कोरोना विषाणूचा फैलाव चीनमधून झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
@@AUTHORINFO_V1@@