‘माझ्या धर्मांतरणासाठी अनेक प्रयत्न, पण मला हिंदू असण्याचा गर्व’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

danish kaneria_1 &nb


नवी दिल्ली
: पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने ट्वीट करत, मी धर्म बदलावा याकरिता अनेक प्रयत्न होत असून,त्यांचे हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. मला हिंदू असल्याचा गर्व आहे असेही सांगितले.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दानिश कनेरिया या हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर शोएबच्या वक्तव्याला दानिश कनेरियाने दुजोराही दिला होता. त्यानंतर आता दानिश कनेरियाने मी धर्म बदलावा यासाठी काही लोक प्रयत्न करत असल्याचे ट्वीट केले आहे. अमना गुल नावाच्या एका महिलेने कनेरियाने इस्लाम धर्म स्वीकारावा, इस्लाम धर्म म्हणजे सोनं आहे. इस्लामशिवाय जीवन व्यर्थ आहे, अशा आशयाचे ट्वीट केले होते. याला दानिश कनेरियाने उत्तर दिले आहे.
@@AUTHORINFO_V1@@