निर्भया दोषींना पुढील आदेशापर्यंत फाशी नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

nirbhaya_1  H x



नवी दिल्ली
: निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत या चौघांना फाशी देण्यात येऊ नये, असे दिल्लीतील पतियाळा हाउस कोर्टाने स्पष्ट केले असल्याने उद्या (१ फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता या चौघांना होणारी फाशी टळली आहे.



पतियाळा हाउस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीसाठी काढण्यात आलेल्या 'डेथ वॉरंट'वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे फाशी दुसऱ्यांदा लांबणीवर गेली आहे. याआधी २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तेव्हाही फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.



या निर्णयावर निर्भयाची आई भावनिक झाली आणि रडत म्हणाली की, आरोपींच्या वकिलांनी यापूर्वी आम्हाला आव्हान दिले होते की या दोषींना कधीच फाशी होऊ देणार नाही. आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांचे हे विधान सिद्ध केले आहे. त्या म्हणाल्या की , आरोपींना जे पाहिजे तेच होत आहे. आता असे दिसते की सर्वच लोक दोषींना पाठिंबा देत आहेत. मी कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. परंतु सरकारने आणि कोर्टाने आता याचा विचार केला विचार केला पाहिजे. यासह निर्भयाची वकिली करणारे वकीलही अस्वस्थ झाले आणि म्हणाले की, न्यायाला विलंब होत आहे. पण निर्भयाच्या दोषींना फाशी देईपर्यंत ते हार मानणार नाहीत.



@@AUTHORINFO_V1@@