दिल्लीच्या विकासाची बुलेट ट्रेन चालवू : नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

saf_1  H x W: 0
 
 
नवी दिल्ली : दिल्ली आणि भारतीय जनता पक्षाचे अतुट नाते असून दिल्लीच्या विकासाची बुलेट ट्रेन भाजप चालविणार आहे. दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाजप कटीबद्ध असून सत्ता आल्यास देशाचा राजधानीचा चौफेर विकास करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली भाजपच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा शुक्रवारी प्रकाशित केला. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीचे प्रभारी प्रकाश जावडेकर, शाम जाजू, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांच्यासह दिल्लीचे सर्व खासदार उपस्थित होते.
 
दिल्ली आणि भारतीय जनता पक्षाचे अतुट नाते आहे, भाजपचा इतिहास दिल्लीसोबत जोडला गेला आहे. दिल्लीच्या विकासाची बुलेट ट्रेन भाजप चालविणार आहे. दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाजप कटीबद्ध असून सत्ता आल्यास देशाचा राजधानीचा चौफेर विकास करण्यात येईल. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनप्रमाणे दिल्लीवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत, पंतप्रधान किसान सन्मान निधीसारख्या केंद्र सरकारच्या सर्व योजना लागू करण्यात येतील. रोजगार वाढविण्यासाठी सर्व रिक्त सरकारी पदांवर भर्ती करण्यात येणार असल्याचे गडकरी म्हणाले.
 
जाहिरनाम्यातील ठळक बाबी
 
- १० नवी महाविद्यालये आणि २०० नव्या शाळा बांधणार
 
- इयत्ता नववीतील विद्यार्थीनींना सायकल देणार
 
- गरिब विधवा महिलेच्या मुलीच्या लग्नासाठी २१ हजार रूपये भेट देणार
 
- पाच वर्षात दहा लाख बेरोजगारांना रोजगार देणार
 
- गरिबांना दोन रूपये किलो दराने धान्यपीठ देणार
 
- नव्या अधिकृत कॉलन्यांच्या विकासासाठी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना
 
- महाविद्यालयीन विद्यार्थींनींना इलेक्ट्रिक स्कुटर
 
- कचऱ्याची समस्या संपुष्टात आणणार
 
- तीन ते पाच वर्षात दिल्लीस टँकरमुक्त करणार
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@