विप्रोच्या सीईओंचा राजीनामा

    31-Jan-2020
Total Views |
wiporo _1  H x




मुंबई
: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आबिदअली नीमचवाला हे पदावरून पायउतार झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विप्रोने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. कंपनीने सीईओ पदासाठी नव्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
 
त्यांच्या राजीनाम्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. विप्रोचा शेअर दोन टक्क्यांनी घसरला. एप्रिल २०१५ मध्ये विप्रो समुहाचे अध्यक्ष व सीईओ म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. टीसीएसमध्ये ते २३ वर्षे होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये ते सीईओ-व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षापर्यंत होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. एनआयटी रायपूर येथून त्यांनी इलेक्ट्रोनिक्स एण्ड कम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली होती.
 

नीमचवाला यांच्या कार्यकाळात विप्रोचा जगभर विस्तार

 
विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नीमचवाला यांच्या कार्यकाळात दिलेल्या नेतृत्व आणि योगदानासाठी आम्ही आभारी आहोत. प्रमुख अधिग्रहण आणि त्यांनी केलेल्या डिजिटल बिसनेस विस्तार जगभरात झाला.' 'विप्रोने माझ्या कार्यकाळात मोठे बदल पाहिले. या काळात विप्रोने प्रगती केली. ग्राहकांवर अधिकाधिक लक्ष देत प्रक्रीयेत सुधारणा करण्यात आली. यासाठी मी अजीम प्रेमजी, रिशद प्रेमजी, सर्व संचालक आणि सर्व ग्राहकांचा मी आभारी आहे, अशी प्रतिक्रीया नीचमवाला यांनी दिली आहे.