कानपूरमधून पीएफआयचे पाच सदस्य अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |

PFI members_1  




कानपूर : सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात देशभरात हिंसाचार तसेच चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कानपूरसह इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये सीएए आणि एनआरसीविरूद्ध हिंसा भडकवण्याच्या तयारीत असणाऱ्या पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. कानपूरमध्ये पकडलेले पीएफआयचे सदस्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी जमले होते.


कानपूर शहरात हिंसाचार पसरवण्याचा कट रचलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) व एआयएमआयएमच्या(ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम) अनेक लोकांना ओळखण्यात आले आहे. कानपूरमधील बाबूपुरवा आणि यातिमखान्यात पीएफआयने हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. पुरावे जमा झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले. जुम्मेच्या नमाजानंतर काही लोकांनी भाषण देऊन जमावाला चिथावणी दिली हेही उघडकीस आले.



एसएसपी अनंत देव यांनी सांगितले होते , दोन्ही संघटनांच्या लोकांनी यापूर्वीच हिंसाचाराचे कट रचले होते. यात बाहेरील लोकांचाही समावेश आहे. पाळत ठेवणे, व्हिडिओ फुटेज, छायाचित्रे आणि इतर माध्यमांद्वारे या बाहेरील लोकांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. कानपूरमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या हिंसाचारात गेल्या दोन दिवसांत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह ४२ पोलिस जखमी झाले.
@@AUTHORINFO_V1@@