फारुखाबाद ओलिसनाट्य समाप्त : २३ मुलांची सुखरुप सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2020
Total Views |
Farrukhabad-hostage-horro


उत्तरप्रदेश पोलीसांना १० लाखांचे बक्षीस

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद येथील ओलीस ठेवलेल्या २३ मुलांची अखेर सुखरुप सुटका झाली. ८ तासांच्या थरार नाट्यानंतर या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली. मोठ्या शिताफीने मुलांची सुटका करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाला १० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. सुटकेदरम्यान चकमकीत आरोपी सुभाष माथम ठार झाला.
 
तो कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या घरातून एक रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या थरारात पाच पोलिसांसह सहा नागरिक या कारवाईत जखमी झाले आहेत. आरोपीने २००१ साली एका व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्येप्रकरणी तो जामीनावर बाहेर होता.
 
नेमका प्रकार काय ?
 
आरोपीने मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने गावातील मुलांना घरी बोलावले. नंतर सर्व गावातील मुले दुपारी अडीच वाजण्याता आरोपीच्या घरात दाखल झाली. मग या आरोपीने सर्व मुलांना एका खोलीत बंद केले. गावकऱ्यांना आपली मुले घरी परतली नाही म्हणून त्याच्या घरी गेले. प्रकरण कळल्यावर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर दगड फेक केली. घराचा दरवाजा तोडला. यायाच फायदा घेऊन सर्व पोलिस घरात घुसले. आरोपीला पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने पोलिसांना प्रतिसाद दिला नाही.
 
उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि बॉम्बही फेकले. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी एनएसजी कमोडोंची मदत घेतली. पुढील कारवाई एनएसजीचे पथक दाखल झाल्यानंतर करण्यात आली. त्यानंतर सर्व मुलांची सुखरुप सुटका झाली. यामुळे उत्तर प्रदेश सरकानं पोलिसांनी १० लाखांचं बक्षीस जाहीर केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@