'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून तीन दिवसीय शोभिवंत मत्स्यपालन कार्यशाळा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |
tiger_1  H x W:

 पालघर व रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांना मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) - 'कांदळवन संरक्षण विभागा'च्या (मॅंग्रोव्ह सेल) 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'तर्फे गेल्या आठवड्यात शोभिवंत मत्स्यपालनावर आधारित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या 'कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण' योजनेअंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पालघर आणि रायगड तालुक्यातील या योजनेच्या लाभार्थींना यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले.
 

tiger_1  H x W: 
 
राज्याच्या किनारी भागांमध्ये कांदळवन आधारित रोजगार निर्मिती करण्यासाठी मॅंग्रोव्ह फाऊंडेशनकडून नानाविध योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राच्या किनारी भागातील गावांमध्ये विविध शाश्वत उपजीविका प्रकल्प राबविले जातात. त्यापैकी शोभिवंत मत्स्यपालन प्रकल्प हा एक उपक्रम आहे. यासंदर्भातील कार्यशाळा गेल्या आठवड्यात २० ते २२ जानेवारी दरम्यान ऐरोलीतील 'किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा'तील शोभिवंत माशांच्या हॅचरीमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेत ३७ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी २७ लाभार्थी पालघर जिल्ह्यातील ६ गावांमधून तर १० लाभार्थी रायगड जिल्ह्यातून आले होते. यामध्ये महिलांचा सहभाग सर्वाधिक होता.
 
 

tiger_1  H x W: 
 
मत्स्य पालनाशी निगडीत महत्वाच्या विषयांवर तांत्रिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले. वलाऊन फिशच्या प्रजातींची ओळख, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी, पाणी शुद्धीकरणाची यंत्र प्रणाली, खाद्याबद्दल सविस्तर माहिती, वलाऊन फिशच्या रोगांची माहिती आणि उपचार, विक्रीकरिता वलाऊन फिशची बांधणी,वाहतूक,वितरण व बाजारपेठ यासंबंधीची माहिती तज्ज्ञांकडून लाभार्थींना देण्यात आली. फाऊंडेशनमार्फत उभारण्यात आलेल्या हॅचरीमध्ये राष्ट्रीय मत्स्य अनुवांशिक संशोधन संस्थेतर्फे याचे तांत्रिक मार्गदर्शन व व्यवस्थापन केले जाते. सध्या या हॅचरीमध्ये क्लाऊन माशाच्या १० प्रजातींचे संगोपन करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@