...आणि शशांकला लॉटरी लागली!

    30-Jan-2020
Total Views | 96
shashank_1  H x

 ‘गोष्ट एका पैठणीची’ मध्ये शशांक केतकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

मुंबई : अभिनेता शशांक केतकर 'गोष्ट एका पैठणीची" या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्याच कामासाठी निर्माता अक्षय बर्दापूरकर यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शशांकला चित्रपटाची संहिता ऐकण्याची संधी मिळाली आणि योगायोगानं महत्त्वाची भूमिकाही मिळाली.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स 'गोष्ट एका पैठणीची" निर्मिती करत आहेत. अक्षय बर्दापूरकर निर्माते आहेत. शंतनू रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी दिसणार आहेत.
'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट मला अक्षरशः अपघातानं मिळाला. अक्षय बर्दापूरकर यांच्यासह वेगळ्याच कामासाठी मीटिंग ठरली होती. त्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मात्र, काहीही माहीत नसताना मला चित्रपटाची संहिता ऐकण्यासाठी बोलवण्यात आलं आणि मीही जाऊन बसलो. संहितेचं वाचन झाल्यावर मला त्यात एका भूमिकासाठी विचारणा झाली. संहिता आवडल्यानं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. या चित्रपटामुळे उत्तम संहिता, जाणकार दिग्दर्शक, दमदार स्टारकास्ट अशी संधी मिळाली आहे, ' असं शशांकनं सांगितलं.
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121