ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

    30-Jan-2020
Total Views |
Vidya-Bal _1  H



पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या ८४ वर्षांच्या होत्या. स्त्री-पुरुष समानता, स्त्री हक्कांसाठी आयुष्य वेचलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होते. त्यांचे पार्थीव दुपारी प्रभात रोड येथील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिमदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. स्त्रीयांनाही पुरूषांसोबत समान हक्क मिळावा यासाठी अनेक चळवळीत त्यांनी योगदान दिले. मिळूनी साऱ्या जणी या मासिकांच्या त्या संस्थापिका होत्या. स्त्री हक्कांसाठी आयुष्य वेचणाऱ्या विद्या बाळ यांच्या जाण्याने साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.