धक्कादायक ! कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |

corona virus_1  
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसची भीती पसरली आहे. चीनमध्ये या व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर आता भारतामध्येही शिरकाव केल्याची भीती व्यक्त होत आहे. केरळमधील एका तरुणाला या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुण चीनच्या वुहान विद्यापीठात शिक्षण घेत होता. यावेळी त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर पारख ठेऊन आहेत. 
 
 
 
 
 
अधिक माहितीसाठी हेही वाचा
 
 
कोरोना व्हायरसने चीनमध्ये उच्छाद मांडला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसची लागण होऊन १७० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच, अंदाजे ६ हजरहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. यामुळे मृत्यांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दिल्लीच्या राममनोहर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या कोरोनाच्या तीन संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले होते. तसेच, या कोरोना व्हायरसचा फटका चीनमध्ये शिकणाऱ्या २७ भारतीय विद्यार्थ्यांनाही बसला आहे. यात पुणे, गडचिरोलीसह महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@