बापरे ! जगात सर्वाधिक ट्राफिक शहरांमध्ये मुंबईचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |

Mumbai traffic_1 &nb
मुंबई : मुंबईमध्ये ट्रॅफिक ही समस्या तशी दैनंदिन जगण्याचा एक भाग झाला आहे. एवढेच नव्हे तर मुंबईचा जगभरातील सर्वाधिक ट्रॅफिक असणारी शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो. टॉमटॉमस ट्रॅफिक इंडेक्स या डच कंपनीने जारी केलेल्या अहवालामध्ये ही बाबा समोर आली. जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या दहा शहरांच्या यादीमध्ये चार भारतीय शहरांचा समावेश असल्याचा अहवाल त्यांनी समोर आणला आहे.
 
या अहवालानुसार भारतामधील बंगळुरू हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर ठरले आहे. तर, मुंबईचा यामध्ये चौथा क्रमांक लागतो. बंगळुरू शहरात २०१९ मध्ये लोकांनी प्रवासात सुमारे २४३ तास व्यतीत केले आहेत. ३० मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना ७१% अधिक वेळ लागतो. यासोबतच बेंगलोर सोबत मुंबई, पुणे आणि दिल्ली हेही ट्राफिकच्या बाबत जगातील अव्वल देशांमध्ये आहेत. मनिला (फिलिपिन्स), बोगोटा (कोलंबिया), मॉस्को (रशिया), लिमा (पेरू), इस्तंबूल (तुर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) ही शहरे पहिल्या दहामध्ये आहेत. अहवालानुसार लोक दरवर्षी सरासरी १९३ तास म्हणजे सुमारे ७ दिवस २२ तास ट्राफिकमध्ये घालवतात.
@@AUTHORINFO_V1@@