तुम्ही मंदिर बांधा आम्ही बाबरी बांधू : फरहान आझमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |
Faran-Azami_1  
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला मंदिर बांधण्यासाठी जाणार असतील, तर मी बाबरी बांधण्यासाठी जाईन, असा इशारा फरहान आझमी यांनी दिला आहे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे ते चिरंजीव आहेत. याला धमकी समजा किंवा अजून काही मात्र, तुम्ही राम मंदिर बांधायला जाल तर मी मशिद बांधायला जाईल, असे आझमी म्हणाले.


 
महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सरकारमधील इतर नेत्यांनीही यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन राऊत यांनी केले होते. याच वक्तव्याचा समाचार घेत आझमी यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.




@@AUTHORINFO_V1@@