शिष्यांच्या मुखातून 'गुरु' तर बोलत नाही ना? : आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |

asf_1  H x W: 0
 
 
मुंबई : सध्या महाविकास आघाडीमध्ये वक्तव्यांवरून अंतर्गत वादंग निर्माण होत आहेत. नेत्यांमध्येच 'तुझं माझं पटेना' चे चित्र वारंवार दिसून येत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींवर केलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. यावर आता काँग्रेस नाराज असून काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशो चव्हाण यांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर आता आशिष शेलारांनीदेखील ट्विट करत या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
आशिष शेलारांनी ट्विट केले की, "माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणतात. इंदिरांजीनी लोकशाहीचा गळा घोटला,असे जितेंद्र आव्हाड म्हणतात. दोघांची ओळख ही बारामतीकर गुरुंचे पट्टशिष्य! मग, शिष्यांच्या मुखातून "गुरु" तर बोलत नाही ना? आपले जुने हिशेब चुकते तर करीत नाही ना?" असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे विरोध करण्याच्या नादामध्ये जितेंद्र आव्हाडांची खूप मोठी फजिती झाली आहे.
 
बीडमधील एका कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले होते की, "देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला. त्यामाध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले." या वक्तव्यानंतर लगेचच सारवासारव करत 'इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तुत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात. तसेच, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे. ' असे स्पष्टीकरण दिले होते.
 
यासर्व प्रकरणावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी मात्र त्यांची कानउघडणी करत "देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्यान इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाडांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल." असे वक्तव्य केले. यामुळे महाविकास आघाडीमधील दरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली.
@@AUTHORINFO_V1@@