"म्हातारीचा बुट हवाय म्हणून बालहट्ट पुरवले नाही म्हणजे झालं"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |
Uddhav-Thackeray _1 

मुंबईकरांनी नुकसान सहन करून फक्त बालहट्ट पुरवायचे का : आशिष शेलार


मुंबई : "पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ? एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!", अशा शब्दांत आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आरे कारशेड समितीने दिलेल्या अहवालावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या समितीने आरे कारशेड हे त्याच जागी व्हायला हवे, जवळपास बहुतांश कामे पूर्ण झाली असून आरे कारशेडच्या जागेत आता बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रीया देताना आदित्य ठाकरे यांनी समितीचा निर्णय सरकारला बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल नाकारणाऱ्या सरकारला भाजपने जाब विचारला आहे. तसेच पोलीसांची नाईट लाईफसाठी तयारी नसतानाही निर्णय लादणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली आहे.
 

किती बालहट्ट पुरवणार ?
केवळ युवराजांच्या हट्टासाठी निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. तज्ज्ञ समितीचा अहवाल नाकारायचा आणि पोलीसांची तयारी नसताना नाईट लाईफला पाठींबा दर्शवायचा हे कितपत योग्य आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. एक दिवस म्हातारीचा बूट हवा आहे, म्हणून हट्ट केला नाही, म्हणजे मिळवलं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@