स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे तरुणाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2020
Total Views |

asf_1  H x W: 0
ठाणे : तरुणांमध्ये सध्या शरीर सौष्ठवाबद्दल खास आकर्षण असते. यामुळे चांगले शरीर कमावण्याच्या नादात प्रोटिन्स, स्टेरॉईड्स याचे सेवन होत असते. जेवढे याचे फायदे तेव्हडेच याचे तोटेही असतात. नुकतेच चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी स्टेरॉईड्स घेणे मुंब्य्रातील तरुणाच्या जीवावर बेतले. बॉडीबिल्डर होण्याची इच्छा असलेल्या २३ वर्षीय नावेद जमील खान याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे शहरातील शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणार होता त्याचवेळेस मृत्यू ओढावल्याने बॉडीबिल्डर होण्याचे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
 
नावेदला शुक्रवारी रात्री ताप आला होता. यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला स्थानिक डॉक्टरांकडे दाखवले होते. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर कुटुंबीयांना नजीकच्या बिलाल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केलेल्या चाचण्यांमधूनही धक्कादायक माहिती समोर आली. नावेदला हिपॅटायटीस बी हा आजार होता हे निष्पन्न झाले. तसेच खानच्या शरिरामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही अधिक असल्याचे समजले. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील ग्लुकोकॉट्रीकॉइड्स या संप्रेरकांमुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
दिवसेंदिवस त्याची तब्येत अतिशय बिघडू लागली. यानंतर डॉक्टरांना त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यास तसेच यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे सांगत पैशांची व्यवस्था करण्यासाठी सांगण्यात आले. कुटुंबाने नावेदला केईएम रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्याची प्रकृती खूपच खालावली होती. फुफ्फुस खराब झाल्याने त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला अशी माहिती कुटुंबाने दिली.
@@AUTHORINFO_V1@@