भाजपच्या सीएए जनजागृती गृहसपंर्क अभियानास रविवारपासून सुरूवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


गृहमंत्री अमित शहा दिल्लीतून करणार प्रारंभ

  

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविषयीच्या भाजपच्या गृहसंपर्क अभियानास रविवारपासून प्रारंभ होत आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दिल्ली येथून गृहसंपर्कास सुरुवात करणार आहेत. भाजपचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये जनसंपर्क करतील, अशी माहिती भाजपचे महासचिव डॉ. अनिल जैन यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत दिली. सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी भाजपने देशव्यापी जनसंपर्क मोहीम आखली आहे. देशभरातील ३ कोटी कुटुंबांशी संपर्क, पत्रकारपरिषदा, मेळावे, सभा, कोपरा सभा, पत्रकार संवाद अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

 

गृहसंपर्क अभियानाचा प्रारंभ देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते रविवारी दिल्लीत होणार आहे. त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा गाझियाबाद येथे, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊमध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन जयपूर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद फरिदाबाद येथे गृहसंपर्क करणार आहेत. महाराष्ट्रात नागपूरमध्ये दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुंबईत रेल्वेमंत्री पियुष गोयल अभियानास प्रारंभ करणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी अभियानास यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

सुदारित नागरिकत्व कायद्याच्या जनजागृतीसाछछी भाजपने पाच समित्या गठित केल्या आहेत. जनजागरण अभियानांतर्गत गृहसंपर्क, संवाद समितीमार्फत देशभरात पत्रकारपरिषदा, रॅली, मेळावे, एक लाख कोपरा सभा घेण्यात येणार आहेत. विशेष सामाजिक संपर्क समितीअंतर्गत व्यावसायिक, खेळाडू, महिला, दलित आदी घटकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडीया आणि मिडीया समितीतर्फे याची व्यापक प्रसिद्धीही केली जाणार आहे.

 

काँग्रेसमध्ये माणुसकी उरली नाही - डॉ. अनिल जैन

 
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशातून अत्याचारांपासून आपला जीव वाचविण्यासाठी भारतात आललेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन बांधवांना भारताचे नागरिकत्व देणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, त्यास काँग्रेसचा असलेला विरोध पाहता काँग्रेसमध्ये माणुसकी उरली आहे की नाही, असा प्रश्न पडतो. या शरणार्थींना भारतीय नागरिकत्व द्यावे अशी स्पष्ट भूमिका महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतली होती. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००३ सालीदेखील राज्यसभेत ही मागणी केली होती. मात्र, काँग्रेसने या कायद्याविरोधात जाणीवपूर्वक खोटी प्रचार करून देशात अराजकता पसरविल्याचा आरोप डॉ. अनिल जैन यांनी केला.
 
 

@@AUTHORINFO_V1@@