हृता दुर्गुळे साकारणार प्रेरणादायी ‘अनन्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |

hruta_1  H x W:


छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरू' मालिकेतून प्रेक्षकांच मन जिंकल्यानंतर आता हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" या चित्रपटातून ती चित्रपटजगतात पदार्पण करत आहे.


मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले. 'अनन्या' या नाटकात ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती. नाटकातील तिच्या भूमिकेतील रसिकांनी भरभरून पसंती दिली होती.





ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.





@@AUTHORINFO_V1@@