अनुराधा पौडवाल माझ्या आई ; केरळच्या ४५ वर्षीय महिलेचा दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा दावा केरळमधल्या एका महिलेने केला आहे. करमाला मोडेक्स असे त्यांचे नाव असून त्या ४५ वर्षांच्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी ५० कोटींची नुकसानभरपाई मागतली आहे.

 

तिरूअनंतरपुरम नायायालयाने पौडवाल यांना नोटीस बजावली असून २७ जानेवारीला न्यायालयात हजर राहायला सांगितले आहे. करमाला यांनी आपल्या वकिलासोबत एक पत्रकार परिषद घेऊन हा मोठा दावा केला आहे. करमाला यांनी सांगितले की, "त्या फक्त चार वर्षांच्या होत्या तेव्हा अनुराधा पौडवाल यांनी त्यांना केरळच्या त्यांच्या मित्राच्या हवाली केले होते. पोंनाचन आणि अगनेस असे त्यांच्या केरळच्या पालकांचे नाव आहे."

 

४० वर्षांपूर्वी पौंडवाल दाम्पत्यांनी त्यांना केरळला ठेवले होते. त्यांचे वडिल पोंनाचन यांचे ५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या आधी त्यांनी करमाला यांना खरी परिस्थिती सांगितली होती. अनुराधा पौडवाल या त्या काळात गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांनी असे केले असावे असेही त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@