डोनाल्ड ट्रम्प यांचा एअर स्ट्राईक ; ईरानच्या विशेष लष्कर प्रमुखाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : जगातील शुक्रवारी सर्वात मोठी घडामोड घडली. ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून इराकच्या बगदाद विमानतळावर रॉकेटने हल्ला करण्यात आला. यामध्ये इराणमधील इलीट कुद्स सेनेचा प्रमुख जनरल कासेम सुलेमानी आणि इराकच्या इराण समर्थित संघटना- पॉपुलर मोबिलाइजेशन फोर्स(पीएमएफ)चा कमांडर अबु महदी अल-मुहंदिससह ८ जणांच्या मृत्यू झाला. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय आणि व्हाइट हाउसने या बातमीला दुजोरा दिला आहे.

 

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, "जनरल कासिम मध्य-पूर्वमध्ये अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना आणि इराकमधील सैनिकांना मारण्याचा कट रचत होता. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावर अमेरिकेच्या सेनेने आपल्या जवानांची रक्षा करण्यासाठी जनरल कासिमला कंठस्नान घातले. तो इराणचा विशेष लष्कर रेवोल्यूशनरी गार्डच्या कुद्स फोर्सचा प्रमुख होता. ही अमेरिकेच्या नजरेत एक दहशतवादी संघटना आहे."

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केला राष्ट्रध्वज

 
 
 

कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज ट्विट केला होता. या ट्विटमध्ये काहीही लिहिण्यात आलेले नव्हते. फक्त राष्ट्रध्वजच दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना या ट्विटच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.

 

का घेतला एवढा मोठा निर्णय?

 

पीएमएफने हल्ल्यामागे अमेरिका किंवा इज्राइलचा हात असल्या संशय व्यक्त केला होता. इराण आणि इराकच्या लष्कराशी निगडीत लोकांवर झालेला हा हल्ला, अमेरीकेच्या दूतावासावर जमावाने केलेल्या हल्ल्याच्या दोन दिवसांतच झाला. ३१ डिसेंबरला ईरान समर्थित काही आंदोलकांनी अमेरीकेच्या दूतावासावर हल्ला केला होता. गेट तोडून बाहेर आग लावली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानला या कृत्यासाठी जबाबदार ठरवत मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही दिला होता.

 

पॉपुलर मोबिलाइजेशन फोर्स (पीएमएफ) म्हणजे काय ?

 

इराण समर्थित संघटन पॉपुलर मोबिलाइजेशन फोर्सच्या (पीएमएफ) प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, हल्ल्यात त्यांच्या ५ सैनिकांचा मृत्यू झाला. संघटनेने सुरुवातील या हल्ल्यामागे इज्राइलचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पीएमएफ शिया सैनिकांचा एक गड आहे. हे अधिकृतरित्या इराकच्या सुरक्षादलामध्ये सामील आहेत. रॉकेट हल्ल्यात मारले गेलेले महुंदिस या संघटनेचे उप प्रमुख होते. इराकमध्ये अमेरीकेच्या लष्कराविरुद्ध गेल्यामुळे ट्रप्म सरकारने त्यांना ब्लॅकलिस्ट केले होते.

@@AUTHORINFO_V1@@