सावरकरांच्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा : रणजित सावरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |
Veer _1  H x W:
 


मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर आरोप करत देशभर अराजकता माजविण्याचे षड्यंत्र काँग्रेसने रचले आहे, असा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे. सावरकरांच्या बदनामीचे षड्यंत्र रचणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

 

मध्यप्रदेशमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पुस्तिका सेवा दलच्या सदस्यांना वाटण्यात आली. अशाप्रकारे सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन सरकारने कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधातील पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे समाजा तेढ निर्माण करण्याचा प्रकार असून त्यामुळे भारतीय दंड संहिता १२०, ५००, ५०३, ५०४, ५०५, ५०६याअंतर्गत राष्ट्रीय पुरुषांचा अपमान करणे आणि समाजात अराजकता माजवणे, यासाठी गुन्हे दाखल करण्यात यावे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल करण्यात आलेल्या आक्षेपांना वारंवार उत्तरे देण्यात आली असून त्यांचे खंडन देखील अनेकदा केले गेले आहे, असे असतानाही ही त्यांच्याविषयी बदनामी करणारी पुस्तिका प्रकाशित करण्याच्या खोडसाळपणाचा निषेध करत मध्य प्रदेश सरकारने तत्काळ बंदी घालावी आणि ती मागे घेण्यात यावी, असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे.

 

'या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर यांच्या विषयी घेण्यात आलेले आक्षेप म्हणजे शिळ्या कढीला ऊत देण्यासारखा प्रकार आहे. त्यात नमूद केलेले मुद्दे हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या चर्चांमध्ये वारंवार कसे चुकीचे आहेत हे सिद्ध केले गेले आहेत. त्याला कसलेही प्रमाण नसताना या आरोपांचे पुनर्मुद्रण करणे केवळ नैतिकतेला धरून नाही तर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षड्यंत्र व मोठे कटकारस्थान ह्यामागे आहे,' असा संशय रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे. 'ह्या पुस्तिकेवर बंदी घातली गेली नाही तर मात्र कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल,' असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.





 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@