कल्याण-डोंबिवलीकरांचा रेल्वेप्रवास खडतरच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |
Local _1  H x W


कामाच्या वेळेतच 'लोकल' हाल !


ठाणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीला लोकल फेऱ्यांची भेट देणाऱ्या मध्य रेल्वेचा पहिल्याच आठवड्यात खोळंबा झाला आहे. आंबिवली स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग करताना एका डंरने रेल्वे फाटकाला धडक दिल्याने ओव्हरहेड वायरचा तुटल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

 

रेल्वे प्रशासनातर्फे ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील लोकल वाहतूक वाहतूक ठप्पच झाली होती. सकाळच्या वेळी मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, दोन तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली.

 

ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. लेव्हल क्रॉसिंग करत असताना एका डंपरने रेल्वे गेटला धडक दिली. यावेळी ओव्हरहेड वायरचा खांबाला धडक बसून विद्युत पुरवठा खंडित झाला. तातडीने ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेत ते दुरुस्त करण्यात आले. याचा फटका या घटनेचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, पंजाब मेल अशा गाड्या खोळंबल्या. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी रेल्वेने अर्धा तासाचा ब्लॉक घेतला होता. या दरम्यान ही दुरुस्ती करण्यात आली आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@