वीर भाई कोतवालांची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |

ashutosh_1  H x



ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनी गुरूवारी त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले.


झी मराठीवरील
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून 'बबड्या' म्हणजेच ‘सोहम’ या पात्रामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता आशुतोष पत्की या चित्रपटात भाई कोतवालांच्या भूमिकेत दिसणार आहे. छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर आशुतोष आता मोठ्या पडद्याकडे वळला आहे.







या चित्रपटात आशुतोषसह अभिनेते अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव अभिनेत्री ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी निमकर आदी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

 


स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील
, एकनाथ महादू देसले यांनी सिनेमाची निर्मिती केली असून, सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@