खातेवाटपावरून पवार विरुद्ध चव्हाण ? अशोक चव्हाणांचा बैठकीतून काढता पाय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजूनही खातेवाटपावरून अजूनही घोळ चालूच आहे. हा खातेवाटपाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. पण, या बैठकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच हा वाद झाल्याचे एका वृत्तपत्राने सांगितले आहे. याआधीही अजित पवारांनी खातेवाटपाला होणाऱ्या दिरंगाईवरून कानपिचक्या दिल्या होत्या.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, ग्रामविकास किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख केला. यावरून अशोक चव्हाण संतापल्याचे सांगण्यात येत आहे. 'आम्हीही मंत्रिमंडळात आहोत. ते मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत. मग त्यांचा येथे काय संबंध? मीही माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे तुम्हाला जे बालयचे आहे ते बैठकीत समोर असणाऱ्यांशी बोला.' असे अशोक चव्हाण यांनी अजित पवारांना सांगितले.

 

यावर अजित पवारांनी परत पृथ्वीराज चव्हाणांचा विषय काढत ते संयमी नेते असल्याचे म्हटले. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. तसेच, पृथ्वीराज चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. 'तुमच्यात नेता कोण आहे हे तुम्ही एकदा बाहेर जाऊन ठरवा,' असेही अजित पवार म्हणाले. त्यावरुन चिडलेल्या अशोक चव्हाणांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याची माहिती आहे. यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगण्यात येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@