बहुप्रतीक्षित ‘काळ’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |
kaal_1  H x W:




‘काळ’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित!

मुंबई : बहुप्रतीक्षित हॉरर मराठी चित्रपट 'काळ’ 'चा दुसरा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन डी संदीप यांनी केले असून मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी वाट चोखाळणारा हॉरर चित्रपट म्हणून ‘काळ’कडे पाहिले जात असतानाच, त्याच्या दुसऱ्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढविली आहे.


या ट्रेलरमध्ये युवकांचा एक चमू काही अद्भुत आणि अगम्य अशा गोष्टींनचे खोटे चित्रफीत तयार करून पैसे कमवू पाहते आहे. पण एकदा त्यांचा सामना कोकणातील आडोशाच्या एका बंगल्यात रात्रीच्या किर्र अंधारात खऱ्या भय, अद्भुत, अगम्य शक्तिशी होतो आणि मग त्याचे काय परिणाम होतात याची कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे.






आधी हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. तसेच ‘काळ’ हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर रशियात देखील प्रदर्शित केला जाणार आहे, रशियामध्ये ३० शहरांमध्ये १०० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून रशियात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.



मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपरेल आणि रणजीत ठाकूर, नितीन वैद्य प्रॉडक्शन्सचे नितिन वैद्य, कांतीलाल प्रॉडक्शन्सचे डी संदीप आणि प्रवीण खरात व अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
@@AUTHORINFO_V1@@