धोनी, रोहित आणि कोहली एकाच संघात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |

IPL 2020_1  H x
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद मिळाल्यापासून सौरव गांगुलीने क्रिकेटसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आगामी आयपीएल २०२०च्या सुरुवातीलादेखील एक अनोखा सामना खेळवण्यात येणार आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकाच संघाकडून खेळणार आहेत. आयपीएलच्या १३व्या हंगामाआधी पहिल्यांदाच एका चॅरिटी सामन्याचे आयोजन करण्यात येऊ शकते.
 
आयपीएलच्या १३व्या हंगामाला २९ मार्चला सुरुवात होणार आहे. हे सामने सुरु होण्यापूर्वी एका चॅरिटी सामन्याचे आयोजन करणार असून यामध्ये ८ संघांमधील खेळाडू एकाच वेळी एकाच सामन्यात मैदानात उतरवण्याचा विचार करण्यात आला आहे. याबाबतचे निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये घेतले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने या चॅरिटी सामन्यासाठी दोन संघ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिला संघ हा उत्तर आणि पूर्व भारत असेल तर दुसरा संघ हा दक्षिण आणि पश्चिम भारत असेल. त्यामुळे एका संघामध्ये दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू असतील. तर, दुसऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनराइजर्स हैदराबादचे खेळाडू असतील.
 
या ऑल स्टार क्रिकेट संघात दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसतील. त्यामुळे या सामन्यांमध्ये विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जसप्रीत बुमराह, शेन वॉटसन, हरभजन सिंग आणि लसिथ मलिंगासारखे दिग्गज एकत्र खेळणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@