फुलराणीच्या हाती कमळ : सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2020
Total Views |

asf_1  H x W: 0
 
 
नवी दिल्ली : भारताची बॅटमिंटनपटू 'फुलराणी' सायना नेहवालने बुधवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दिल्ली मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तिने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारही करणार आहे. २९ वर्षांच्या सायना नेहवालने बॅटमिंटन क्षेत्रामध्ये भारताकडून खेळताना अनेक पुरस्कार, पदके आपल्या नावे केली आहेत.
 
सायना नेहवालचा समावेश जगभरातील उत्कृष्ट बॅडमिंटनपटूंमध्ये केला जातो. सध्या सायना आठव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी हरियाणा विधानसभा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निडवणुक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये सायना कोणत्या भूमिकेमध्ये दिसेल हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे. सायनाने आतापर्यंत २४ आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावली आहेत. तिने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिने कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता.
@@AUTHORINFO_V1@@