हत्ती संवर्धनासाठी झटणाऱ्या पशुवैद्यकाला 'पद्मश्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:


आसाममधील 'हाथी डाॅक्टर'ला पद्म पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) - नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये आसामधील एका पशुवैद्यकाचा समावेश आहे. वन्यजीव उपचार आणि हत्ती संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आसामधील पशुवैद्यक डाॅ. कुशल कोंवर सरमा यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या तीन दशकांपासून डाॅ. कोंवर वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.

 

tiger_1  H x W: 
 

यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रांबरोबरच पर्यावरण संवर्धन क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या व्यक्तींना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये एकही दिवस सुट्टी न घेता ७ हजार हत्तींवर उपचार केलेल्या डाॅ. कशुल कोंवर सरमा यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेल्या तीस वर्षांपासून कोंवर पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गुवाहाटीमधील 'वेटर्नरी सायन्स' महाविद्यालयाच्या 'सर्जरी अॅण्ड रेडिओलाॅजी' विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. उधळलेल्या रानटी हत्तींना बेशुद्ध करुन त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये डाॅ. कोंवर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. म्हणूनच त्यांना आसाममध्ये 'हाथी डाॅक्टर' नावाने ओळखले जाते.

 

tiger_1  H x W: 
 

डाॅ. कोंवर यांनी हत्ती संवर्धनामध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी पिंजराबंद आणि नैसर्गिक अधिवासातील मिळून सुमारे सात हजार हत्तींवर उपचार केले आहेत. शिवाय गेल्या तीस वर्षांमध्ये त्यांनी २०० उधळलेल्या हत्तींना प्रशिक्षित केले आहे. आसामध्ये दरवर्षी विषबाधा किंवा विजेचा झटका लागून सुमारे एक हजार हत्तींचा मृत्यू होतो. अशा प्रकरणांमध्येही डाॅ.कोंवर वन विभागाची मदत करतात. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांची केंद्रीय वन विभागाच्या 'प्राॅजेक्ट एलिफंट' समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय 'आययुसीएन'च्या आशियाई हत्तींच्या विशेष समितीचेही ते सदस्य आहेत. हत्तींच्या संवर्धनासाठी महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या पशुवैद्यकाला पद्म पुरस्कार जाहीर झाल्याने पशुवैद्यकीय क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@