भारतीय लष्कर पाकिस्तानला दहा दिवसांत हरवेल : पंतप्रधान मोदी

    28-Jan-2020
Total Views | 84
narendra modi_1 &nbs




नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातून आलेल्या एनसीसी कॅडेट्सला संबोधित केले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त हे कॅडेट्स दिल्लीत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत, हे शेजारी देशाला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटले तर, आठवडा किंवा दहा दिवसांत हरवू शकते, असे ते म्हणाले.

यावेळी मोदींनी काँग्रेस, बसपसह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. आधीच्या सरकारांनी अनेक दशकांपासून संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा रखडवला आणि व्होटबँकेचे राजकारण करत राहिले, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

आपल्याला माहीत आहे की, शेजारी देश आपल्याकडून तीन-तीन युद्ध हरला आहे. आपल्या सैन्याला त्यांना धूळ चारण्यासाठी दहा दिवसच लागतील. अनेक दशकांपासून भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आमचे जवान शहीद होत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावरून मोदींनी विरोधकांवर टीका केली. मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जन्माला आलेलो नाही, माझ्यासाठी देशाची प्रतिष्ठाच सर्वकाही आहे. अनेक दशकांपासूनच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमच्या सरकारच्या निर्णयाला काही लोक सांप्रदायिक रंग देत आहेत. त्यांचा खरा चेहराही देशाने पाहिला आहे. देश सगळे काही पाहत आहे. समजत आहे. गप्प असले, तरी त्यांना सगळे कळते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. दहशतवाद, बॉम्बस्फोट हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेतील अडचणी आहेत, असे आधीचे सरकार विचार करत होते. भारतमाता रक्तबंबाळ होत होती. भाषणबाजी खूप झाली होती, आपले सैन्य कारवाई करण्यासाठी विचारणा करत होते, त्यावेळी त्यांना मनाई करण्यात येत होती. आता विचार तरूण आहेत. देश पुढे जात आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक होत आहेत. दहशतवादाला थारा देणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवला जात आहे.

कलम ३७० हे अस्थायी होते. मग मागील सरकारने ते हटवण्यासाठी हिंमत का दाखवली नाही? आम्हाला काश्मीरची काळजी वाटत होती. त्यामुळे आम्ही कलम ३७० रद्द केले. दहशतवादाने काश्मीरला उद्ध्वस्त केले. काश्मिरी पंडितांना बेघर केले. मग आम्ही काश्मीरला असंच वाऱ्यावर सोडणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
अग्रलेख
जरुर वाचा
बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121