मुंबईत शाहीनबागचा तमाशा सुरू झाला : अतुल भातखळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020
Total Views |
Atul-Bhatkhalkar-Uddhav-T


'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे प्रकार बंद होते'

मुंबई : अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सुरू असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. 'मुंबईत शाहीनबागचा मुंबईत शाहीनबागचा तमाशा सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात असे प्रकार बंद होते, मुंबईत दंगल घडवणा-या रझा अकादमी सोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केल्यानंतर अशा प्रकारांना ऊत येणे स्वाभाविकच नाही का?,' असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. मुंबईत शाहीनबागच्या धर्तीवर सुरू असलेल्या नागपाड्यातील आंदोलनावर त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला आहे.
 



नागपाडा येथे सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनामुळे स्थानिक वेठीस धरले जात असून पोलीसांनी हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. आंदोलनकर्त्यांनी मात्र, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस आहे.


नागपाडा, मुंबईतील मुस्लीम बहुलभागात इथल्या महिलांनी सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू केलेले आहे. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांत अडथळा येत असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.

 
रुग्णवाहिका, शाळा महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी आणि इतर स्थानिकांना या ठिकाणांहून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तसेच या कारणामुळे वाहतूक कोंडी सहन करावी लागत आहे. पोलीसांनी महिला आंदोलकांना दुसऱ्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी काढून यावर तोडगा निघू शकतो, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@