मोदी विरोधकांचा अड्डा म्हणजे शाहीन बाग- रविशंकर प्रसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020
Total Views |

ravishankar prasad_1 
 
नवी दिल्ली : शाहीन बाग एखादी जागा अथवा विचार नसून तो मोदी विरोधकांचा अड्डा आहे. तुकडे तुकडे गँगचे ते व्यासपीठ असून तेथे लहान मुलांच्या मनात पंतप्रधानांविरोधात विष पेरले जाते, अशी घणाघाती टीका केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारपरिषदेत मंगळवारी केली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलनामुळे दिल्लीकर जनतेला मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही हा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. शाहीन बाग एखादी जागा अथवा सार्वजनित स्थान नाही, तो फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांचा एक अड्डा आहे. शाहीन बाग म्हणजे एक विचार असल्याचे संगितले जात आहे, मात्र त्यात कोणतेही तथ्य नसून तेथे भारताचे तुकडे करू इच्छिणारी तुकडे तुकडे गँग सक्रीय आहे. त्यांच्याद्वारे लहान मुलांच्या मनातही पंतप्रधानांविरोधात विष पेरले जात असून हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप रवीशंकर प्रसाद यांनी केला.
शाहीन बागविषयी राहुल गांधी आणि केजरीवाल शांत असले तरीह त्यांच्या पक्षातील नेते मनिष सिसोदीया, दिग्वीजय सिंह, मणीशंकर अय्यर तेथे जाऊन काय बोलले आहेत, ते संपूर्ण देशानेन बघितले आहे. मात्र, आता पुन्हा देशाची फाळणी होणे शक्य नाही, हे काँग्रेसने ध्यानात घ्यावे. तसा कोणी विचार करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. संसदेने बहुमताने संमत केलेल्या कायद्यास विरोध करणे लोकशाहीविरोधी असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात कायद्याविरोधात अपील करण्यात आले आहे, न्यायालयाने चार आठवड्यात उत्तर मागितले आहे. लोकशाही प्रक्रीयेनेट सर्व काही सुरू असताना धरणे आंदोलन करून रूग्णावाहीका अडविणे, शाळेच्या बस अडविणे असे प्रकार केले जात आहेत. याचा सरळ अर्थ म्हणजे मूठभर लोक अजुनपर्यंत शांत बसलेल्या बहुसंख्याकांना त्रास देत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@