महाराष्ट्रानंतर कोरोनाव्हायरस राजस्थान, बिहारच्या वाटेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020
Total Views |

coronavirus_1  

 


नवी दिल्ली : चीनमध्ये हाहाःकार माजवलेल्या कोरोनाव्हायरसने दबक्या पावलांनी भारतातही प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत मृतांचा आकडा ८०वर पोहोचला आहे. याशिवाय जगभरातील इतर देशांतही हा विषाणू पसरला आहे. राज्यानंतर आता जयपूरमध्ये कोरोनाव्हायरसचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तर बिहारमध्ये एका मुलीला या विषाणूची लागण झाली आहे.

 

राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून भारतात आलेल्या या विद्यार्थ्याला लागण झाली आहे. यासोबत विद्यार्थ्याच्या परिवारातील सर्वांची चाचणी करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. या सर्वांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल वायरॉलोजी लॅब येथे पाठवण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये १८जण चीनमधून भारतात परतल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

 

बिहारमध्ये सतर्कतेचा इशारा

राज्यातील अहवालानुसार, कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या भीतीने एका मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला पीएमसीएच रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही मुलगी चीन येथे शिकण्यासाठी गेली होती. ती २२ जानेवारी रोजी भारतात परतली होती. प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे कोरोना तपासणीची व्यवस्था नसल्याने तिला दुसरीकडे हलवण्यात आले.

 

२९ हजार प्रवाशांची तपासणी

देशभरातील सात विमानतळांवर १३७ उड्डाणे झालेल्या २९ हजार जणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, एकाही चाचणीत संशयित रुग्ण आढळलेला नाही. २६ जानेवारी रोजी २२ उड्डाणांदरम्यान, ४ हजार ५९ प्रवाशांची चाचणी करण्यात आली याही चाचणीत कुठलाही रुग्ण आढळलेला नाही.

 

नेपाळच्या सीमाभागात दक्षता

नेपाळच्या सीमावर्ती भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पिथौरागडच्या झुलझुलाट आणि जौलजीबीमध्ये नेपाळच्या सीमेलगत आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.

 










 
@@AUTHORINFO_V1@@