बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : अमेरिकाच स्टार बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा अपघाती मृत्यू झाला. हेलिकॉप्टरला हवेत असतानाच आग लागून अपघात झाला आहे. लॉस एंजलिसपासून ६५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली असून यामध्ये हेलिकॉप्टरमधील सर्व ९ जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये ब्रायंटसह त्याच्या १३ वर्षीय मुलीचाही समावेश असल्याने जगभर हळहळ व्यक्त होत आहे. भारतातील बास्केटबॉल प्रेमींकडूनदेखील त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कोबी ब्रायंटच्या मालकीचे होते. आग लागल्यामुळे हे हेलिकॉप्टर झुडुपांमध्ये कोसळले. तिथेही आग लागल्याने अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या अपघातात मरण पावलेल्या अन्य प्रवाशांची ओळख पटविण्याचे कामदेखील सुरू आहे. ब्रायंटच्या या अपघाती मृत्यूमुळे क्रीडाविश्वाला जबरदस्त धक्का बसला असून यामुळे जगभरातील क्रीडाक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@