...तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू : अशोक चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2020
Total Views |

Ashok Chavan _1 &nbs



नांदेड : भाजपशी काडीमोड घेतल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन करू पाहणाऱ्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा विरोध होता, असा गौप्यस्पोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, मात्र त्यांचे मन वळवण्यात आम्ही यशस्वी झालो, असेही ते म्हणाले. नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर चोहोबाजूने चव्हाणांवर टीका होऊ लागली. चव्हाण यांना या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण द्यावे लागले. आता पुन्हा एकदा त्यांनी तीन पक्षाच्या सरकार बनवण्यासंबंधीचा गौप्यस्फोट केल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

...तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तीनही पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा सुरूच ठेवला होता. दरम्यान, चव्हाण म्हणाले, 'सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले होते. महाविकास आघाडीच्या उद्देशांबाहेर कुठलेही काम शिवसेनेने केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला, असे बोलून त्यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच तंबी दिली आहे. संविधानाच्या चौकोटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे झाले नाही तर सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

 
@@AUTHORINFO_V1@@