शरद पवारांची सुरक्षारक्षा पुन्हा तैनात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2020
Total Views |

pawar_1  H x W:


चार पोलीस आणि एक कमांडर पवारांच्या ‘सहा जनपथ’वर तैनात


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घराबाहेर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुन्हा सुरक्षाव्यवस्थात तैनात करण्यात आली आहे. आज सकाळपासून चार पोलीस आणि एक कमांडर पवारांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. मात्र पवारांच्या निवासस्थानाची कुठलीही सुरक्षा काढून घेतलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.  


सध्या महाराष्ट्रात शरद पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी जवानांमार्फत सुरक्षा पुरवली जाते. पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक तैनात असायचे. मात्र
, २० जानेवारीपासून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही सुरक्षा हटवली होती.


यावरून बराच गदारोळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी
सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. राजकारण करुन शरद पवारांची सुरक्षा हटवण्यात आली असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. जे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी केली होती.


काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता. तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना केंद्र सरकारतर्फे पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही हटवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षाव्यवस्था अन्यत्र वळवण्यात आल्याचा अंदाज बांधण्यात आला होता.

@@AUTHORINFO_V1@@