गौरवास्पद ! महाराष्ट्राच्या बिजमाता राहिबाई पोपरे यांना पद्मश्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी २१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन थोर व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, बिजमाता म्हणून ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे आणि गावाला दुष्काळामधून बाहेर काढत आदर्श गाव बनवणारे पोपटराव पवार यांच्या नावांची पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली आहे.

 
 
 

यांच्याशिवाय देशभरातून २१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. गदीश जल अहुजा, मोहम्मद शरिफ, तुलसी गौडा आणि मुन्ना मास्टर यांचाही या २१ जणांमध्ये समावेश आहे. पोपटराव पवार हे 'आदर्शगाव हिवरे बाजार' चे सरपंच असून जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. तर 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांना शेती क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. जगदीश जल अहुजा हे 'लंगर बाबा' म्हणून ओळखले जातात. ते गेली कित्येक वर्षांपासून दररोज ५०० पेक्षा जास्त गरीब रुग्ण आणि गरजूंना जेवण पुरवण्याचे काम करतात.

 
@@AUTHORINFO_V1@@