जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2020
Total Views |

 

saf_1  H x W: 0

 

मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण


नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे २०२० सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामचळवळीचे प्रणेते पोपटराव पवार, बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई पापेरे, सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

दरवर्षीप्रमाण केंद्र सरकारतर्फे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सात जणांना पद्मविभूषण, १६ जणांना पद्मभूषण तर ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजवादी चळवळीतील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहिर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माजी अर्थमंत्री आणि कायदेपंडित अरुण जेटली, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पेजावर मठाचे प्रमुख विश्वेषातीर्थथस्वामी यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. मुष्टीयोद्धा एम. सी. मेरी कोम, कलाक्षेत्रातील चुन्नूलाल मिश्रा आणि मॉरिशसचे माजी पंतप्रधान अनिरूद जुगनाथ यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

पद्मभूषण पुरस्कार एकुण सोळा जणांना जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा, माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), मुमताज अली, सैयद मुआजेम अली (मरणोत्तर), मुजफ्फर हुसैन बेग, अजय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णाम्मल जगन्नाथन, एससी जमिर, अनिल प्रकाश दोषी, सेरिंग नंडोल, आनंद महिंद्रा, नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर), प्रो जगदीश सेठ, पीवी सिंधु, वेणु श्रीनिवासन यांचा पद्मभूषण पुरस्कारांत समावेश आहे. यंदाच्या वर्षी एकुण ११८ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील हिवरे बाजार या आदर्शग्रामाचे प्रणेते पोपटराव पवार, बियाणे संवर्धन करणाऱ्या बिजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहिबाई पापेरे, गायक सुरेश वाडकर लंगर बाबा नावाने प्रसिद्ध जगदीश लाल आहूजा, २५ हजार बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणारे जावेद अहमत टाक यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रातील ११ जणांना पद्मश्री

 

महाराष्ट्रातील एकूण ११ नामवंतांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून त्यात क्रिकेटपटू झहीर खान, डॉ. पद्मावती बंदोपाध्याय, रमण गंगाखेडकर, करण जोहर, सरिता जोशी, एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी, सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सय्यदभाई, डॉ. सुरेंद्र डेसा सौजा आणि सुरेश वाडकर यांचा समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@