सत्तेत सोबत मग बाळासाहेबांना अभिवादन का नाही ? : नितेश राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |
Nitesh Rane _1  
 


मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंतांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींसह अन्य भाजपच्या नेत्यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या. मात्र, काँग्रेसच्या दिल्लीतील कुठल्याही नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही ट्विट केलेले नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून शिवसेनेचा समाचार घेतला आहे.


 

'महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळचा एकही फोटो राहुल गांधींनी ट्विट का केला नाही, इतकेच नव्हे तर सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एकही फोटो ट्विट का केला नाही,' असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदूत्ववादी भूमीकेचे स्वागत करत त्यांनी बाळासाहेबांचे विचार राज ठाकरे खऱ्या अर्थाने पुढे नेत असल्याचे म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचललेला हिंदूत्वाचा मुद्दा हा प्रत्येक शिवसैनिकाला अपेक्षित आहे. मात्र, सत्तेसाठी जुळवाजुळव करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना आपलीच वक्तव्ये मागे घ्यावी लागतात, हे दुःख कट्टर शिवसैनिकांना पचवणे जड जात आहे, असेही ते म्हणाले.














@@AUTHORINFO_V1@@