यापुढे गर्भवती महिलांना अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |

us_1  H x W: 0



राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत व्हिसास नकार; ट्रम्प प्रशासनाचा निर्णय


वॉशिंग्टन : अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना आता अमेरिकेचा व्हिसा देण्यात येणार नसल्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. अन्य देशातून येणाऱ्या गर्भवती महिलांना टेंपररी व्हिजिटर (बी१-बी२) व्हिजा येणार नाही. अमेरिकेतील बर्थ टूरिझमरोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


नव्या नियमांचा संबंध आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशीही आहे. तसेचबर्थ टूरिझमद्वारे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंधीत करणे देखील गरजेचे असल्याचे, ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. नव्या नियमांनुसार गर्भवती महिलांना प्रवासी व्हिसावर अमेरिकेत प्रवास करणे कठीण ठरणार आहे. गर्भवती महिलांना अमेरिकेत जायचे असल्यास त्यांना अमेरिकेत जाण्याचे कारण काऊन्सिलर अधिकाऱ्याला पटवून द्यावे लागणार आहे. ट्रम्प प्रशासन सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या स्थलांतरावर बंदी आणत आहे. तसेच जन्मत: मिळणाऱ्या नागरिकत्वावरही त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.


रशिया आणि चीनसारख्या देशांमधून अनेक महिला आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी अमेरिकेत येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक अमेरिकन कंपन्या यासाठी जाहिरात देत असतात. तसेच वैद्यकीय सेवा आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी तब्बल ८० हजार डॉलर्स घेतले जातात. परंतु याची कोणतीही माहिती अमेरिकेकडे उपलब्ध नाही. २०१२ मध्ये ३६ हजार गर्भवती महिलांनी आपल्या मुलांना अमेरिकेत जन्म दिला आणि त्यानंतर त्या परतल्या असल्याची माहिती ग्रुप सेंटर फॉर इमीग्रेशन स्टडीजकडून देण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@