कमलेश तिवारींच्या वकीलाला जीवे मारण्याची धमकी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |

Kamlesh_1  H x

 


लखनऊ : हिंदू महासभा नेते तसेच हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्या प्रकरणाचा खटला लढणारे वकील सुशील कुमार वाजपेयी यांना ठार करण्याची धमक्या येऊ लागल्या आहेत. वजीरगंज कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

 

नाका मोती नगर या भागात वकील वाजपेयी राहतात. कमलेश तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी यांच्यातर्फे ते या हत्याप्रकरणी खटला लढत आहेत. १८ जानेवारी रोजी सुनावणी होती. यावेळी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. काही आरोपींना भेटण्यासाठी त्यांचे परिचित तिथे पोहोचले होते, यात एका महिलेचा सामावेश होता.

 

आरोपींनी त्यांच्याकडे पाहून इशाऱ्याने तिथे उपस्थितांना वकील वाजपेयी ओळख पटवून देत होते, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी परिचितांकडे मोबाईल फोनची मागणी केली. मोबाईल न दिल्याने दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. आरोपींना सोडवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा वकीलांनाही बघून घेऊ, अशी धमकी दिल्याचे वाजपेयी यांनी सांगितले.
 

हा प्रकार वाजपेयी यांनी पोलीसांना सांगितला. पोलीसांनी आरोपींना घटनास्थळावरून तुरुंगात पाठवले. सुशील कुमार यांच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी नाका खुर्शीदाबाद येथील पक्ष कार्यालयात उर्दूमध्ये लिहीलेले एक पत्र पाठवण्यात आले होते. तिवारी यांच्या पत्नी किरण तिवारी यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली होती.





@@AUTHORINFO_V1@@