५ व्या 'लालबाग कला महोत्सवा'त शिल्प-चित्र-नृत्याचा संगम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:


२५ व २६ जानेवारी रोजी महोत्सवाचे आयोजन

 

मुंबई (प्रतिनिधी) - 'रंगरेषा स्कुल आॅफ आर्ट आणि डिझाईन' या संस्थेच्या विद्यमाने २५ व २६ जानेवारी रोजी 'लालबाग कला महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. लालबागमधील पेरूचाळ कपाऊंडमध्ये हा महोत्सव पार पडेल. मुंबईकरांना या महोत्सवात चित्र, शिल्प आणि नृत्य कलेचा आनंद लुटता येणार आहे.

 

tiger_1  H x W: 
 

गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळ या परिसराला सांस्कृतिक वैभव लाभले आहे. या विभागाने कला क्षेत्राला आजवर अनेक कलाकार दिले आहेत. त्यामुळे या परिसराचे कलात्मक वैभव टिकून ठेवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून 'लालबाग कला महोत्सवा'चे आयोजन करण्यात येत आहे. यंदा महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. २५ व २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत लालबागमधील पेरूचाळ कपाऊंडमध्ये हा महोत्सव पार पडेल. दोन दिवसीय या महोत्सवात विविध कला सादर करण्यात येतील. २५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.

 

tiger_1  H x W: 
 

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे यांची शिल्पगणेशा कार्यशाळा पार पडेल. त्यानंतर व्यक्तीचित्रणावर चित्रकार अभिजीत पाटोळे, निलिशा फड आणि व्यंगचित्रावर उद्य मोहिते यांचे सत्र होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्गचित्रावर नानासाहेब येवले यांचे सत्र होईल. त्यानंतर भव्य चित्रकला स्पर्धा पार पडेल. सायंकाळी ४ वाजता शास्त्रीय नृत्यांगणा अपेक्षा घाटकर यांच्या नृत्यासमेवत शिल्प व चित्रकलेच्या संगमाची अनूभुती प्रेक्षकांना घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी सुनिल कापसे (९८९३३२१२५०) यांच्याशी संपर्क साधावा.


tiger_1  H x W: 
@@AUTHORINFO_V1@@