ठाण्यामधून ४ फूट मगरीचा बचाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:


मुंबई (प्रतिनिधी) - ठाणे घोडबंदर परिसरामधील ओवळा गावातून बुधवारी वन विभागाने ४ फूट लांबीच्या मगरीची सुटका केली. प्राणिप्रेमी संस्थेच्या मदतीने गेल्या दोन दिवसांपासून या मगरीला वाचविण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी या मगरीला पकडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करुन तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 
 

ठाणे आणि आसपासच्या परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील घोडबंद परिसरामधील ओवळा गावात मगरीचे दर्शन होत होते. येथील प्रकाश ठाकूर यांच्या खासगी जागेतील एका खड्ड्यात एका मगरीचे वास्तव्य होते. २९ डिसेंबर रोजी ही मगर दिसल्याने ठाकूर यांनी यासंबंधीची माहिती वन विभागाला दिली होती. त्यावेळी वन विभागाने 'डब्लूडब्लूए' या प्राणिप्रेमी संस्थेतील कार्यकर्त्यांच्या मदतीने या जागेची पाहणी केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना मगर दिसली नाही.

 
 
 

१८ जानेवारी रोजी ठाकूरांना या मगरीचे पुन्हा दर्शन घडले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी 'डब्लूडब्लूए' कार्यकर्त्यांच्या मदतीने २० जानेवारीपासून या मगरीच्या बचावाचे कार्य हाती घेतले. ३० फूट लांब आणि ३५ फूट खोल खड्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अग्निशमन दलाकडून पंप मागविण्यात आल्याची माहिती 'डब्लूडब्लूए'चे प्रमुख आदित्य पाटील यांनी दिली. दोन दिवस खड्ड्यातून पाण्याचा निचरा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही मगर आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. चार फूट लांब या मगरीची सुटका केल्यानंतर तिची परवानगी वैद्यकीय तपासणीसाठी 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' केल्याची माहिती ठाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी दिली. तपासणीनंतर तिची नैसर्गिक अधिवासात सुटका केल्याचे त्यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@