मनसेचा नवा ध्वज : संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा विरोधात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकणाऱ्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. यावेळी मनसेच्या चालेल्या महाअधिवेशनामध्ये एक नवा उत्साह दिसून आला. तसेच, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीदेखील राजकारणामध्ये पाऊल ठेवले. परंतु, झेंड्यावर असलेल्या शिवरायांच्या राजमुद्रेमुळे संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. तसेच, राज ठाकरे आणि मनसेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच, मराठा क्रांती मोर्चादेखील न्यायालयात खटला दाखल करणार आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून मनसेने आयोजित केलेल्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षाने तिचा वापर करणे चुकीचे आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. याचप्रकाराचे निवेदन स्वारगेट पोलीस ठाण्यात दिले आहे.

 

शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर झेंड्यामध्ये केल्यामुळे संभाजी ब्रिगेडप्रमाणेच मराठा क्रांती मोर्चाने देखील यावर आक्षेप घेतला आहे. "मनसेने राजमुद्रेचा वापर टाळावा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा उच्च न्यालायत जाणार असून, या प्रकरणी खटला दाखल करू," असे मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@