सत्तेसाठी रंग बदलणारा मी नव्हे : राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |
Raj Th_1  H x W



मुंबई : 'झेंड्याचा रंग बदलला म्हणून आम्ही भूमीका बदलणारे आम्ही नव्हे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारे आम्ही नव्हे,' असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिला. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने केलेल्या खेळीचा त्यांनी राज्यव्यापी अधिवेशनाच्या भाषणात समाचार घेतला. राज्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडींवर वेळीच उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला.

 

पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांना हकलवून लावणार असाल तर केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए आणि प्रस्तावित एनआरसी विधेयकाला पूर्णपणे पाठींबा देऊ, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशेनातून केली. मनसे ९ मार्च रोजी अशा घुसखोरांना हाकलवून देण्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घुसखोरांच्या ठिकाणांची यादी देणार असल्याचेही राज यांनी सांगितले. मशीदीच्या भोंग्यांवरून राज ठाकरे यांनी मोहल्ल्यांना लक्ष करत नमाज शांततेतही पठण केले जाऊ शकते, त्यासाठी मशिदींवर भोंगे का हवेत, असा सवाल विचारला. ही भूमीका आपण पूर्वीपासून घेत आलो आहोत यात नवे काही नाही, असेही ते म्हणाले.

 

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,' अशी साद घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या भाषणाला सुरुवात केली. 'मी मराठीही आहे आणि हिंदूदेखील आहे', असे सांगत पक्षाचा मुळ अजेंडा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, हिंदू म्हणून कुणी धर्माला डंख लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला अंगावर घेणार असल्याचे इशारा राज ठाकरे यांनी दिला.

 

राज ठाकरे म्हणाले, "मी मराठी आहे आणि मी हिंदूही आहेच. हिंदुत्व कधी बाजूला ठेवले नाही आणि ठेवणारही नाही. रझा अकादमीतील आंदोलकांनी जेव्हा पोलीसांवर हात टाकला त्यावेळी या प्रकाराविरोधात आंदोलन करणारा मीच होता. ज्यावेळी गणेशोत्सव, दहिहंडीसारख्या हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा बंधने घालण्यात आली त्यावेळी सरकारला जाब विचारणारा मीच होतो. हिंदूत्व आम्ही सोडले कधी होते, याचे उत्तर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी द्यावे. आम्ही हिंदूत्व जरी स्वीकारले असले तरीही ए.पी.जे. अब्दुल कलामांना आम्ही विसरू शकत नाही, झहीर खान, जावेद अख्तर हे देखील आमचे आहेत."

 

बांग्लादेशींना हाकलून द्या !

बांग्लादेशींना हाकलून देण्याचे धोरण आम्ही यापूर्वीच उभे केले होते. मशीदीवरचे भोंगे बंद करण्याची मागणी आम्हीच केली होती. बांग्लादेशातून येऊन इथे मोहल्ले उभे केले जातात. केवळ अडीच हजार रुपये मोजून बांग्लादेशी भारतात घुसखोरी करतात. देशाला अंतर्गत शत्रुंचाच मोठा धोका आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

 

'एनआरसी'विरोधात एकवटलेला मुस्लीम कुठला ?

'एनआरसी' आणि 'सीएए' विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लीमांचा राग देशभर झालेल्या हिंसाचारातून दिसून आला. देशभर सुरू असलेल्या आंदोलनात सामील झालेले मुस्लीम कुठून आले, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.




@@AUTHORINFO_V1@@