मनसेचा 'शिव'हुंकार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020
Total Views |

Raj Thackeray _1 &nb



मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकणाऱ्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे गुरुवारी मनसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्यभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्य़ा संख्यने उपस्थिती लावली आहे.


शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेत राज्यात सत्ता स्थापन केली. नंतरच्या काळात शिवसेनेच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे अस्वस्थ असलेल्या हिंदुत्ववादी व मराठीप्रेमी शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मनसेने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे. 'बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.


महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी महाविकास आघाडीस 'सपक खिचडीची' उपमा देत. बाळासाहेबांच्या कडव्या हिंदुत्व असणाऱ्या मराठी शिवसैनिकाला निराश न होता ,मनसेचा झेंडा हाती घ्या असे आवाहन केले आहे. अमेय खोपकर ट्विटमध्ये म्हणतात, 'पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका... निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ, मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ बाळासाहेबांच्या जयंतीला मन सेसामील व्हा.'

भाजपसोबत युती तोडत शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेच्या राजकीय अपरिहार्यता बघता आता शिवसेनेला हिंदुत्व व मराठीची भूमिका जोरकसपणे मांडता येणार नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचाच फायदा उचलून पक्षाला उभारी देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. मनसे पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेय खोपकर यांनी हे ट्विट केले आहे.






@@AUTHORINFO_V1@@